Take a fresh look at your lifestyle.

2020 वर करीना कपूर खान नाराज? म्हणाली आता प्रतिक्षा 2021 ची

मुंबई | सन 2020 मध्ये, बॉलिवूडच्या दिग्गजांनी या जगाचा निरोप घेतला आणि त्यातच भर म्हणजे कोरोना विषाणूमुळे असे प्रथमच घडले जेव्हा भारतातील चित्रपटगृहे इतक्या काळ बंद राहिली होती. यासह चित्रपटांचे आणि टीव्ही कार्यक्रमांचे शुटिंगही थांबविण्यात आले होते, ज्यामुळे केवळ अभिनेत्यांचे नुकसान झाले नाही तर निर्मात्यांचही नुकसान झाल.

सन 2020 चे सोशल मीडियावर बर्‍याच मिम्स आणि विनोदही आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खाननेही आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक चित्र शेअर केले असून, तिने 2020 सालापासून किती अस्वस्थ असल्याचे सांगितले आहे. करीना कपूर खानने तिचे एक चित्र शेअर केले आहे ज्यामध्ये ती पिवळ्या रंगाचे हाफ जॅकेट आणि ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहे.

चित्रात करीना खूप वैतागून बसली आहे आणि ती कुठेतरी विचारात हरवली आहे. चित्राच्या कॅप्शनमध्ये करीनाने लिहिले आहे, “वर्ष 2021 ची प्रतीक्षा करीत आहे.” करिनाच्या या चित्रावर अनेकांनी हसणार्‍या इमोजी बनवल्या आहेत आणि तिच्याशी सहमत असलेल्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या भावना लिहिल्या आहेत.