Take a fresh look at your lifestyle.

करिश्मा तन्ना आणि अदा खान यांचा ‘नागीन’ डान्स,विडिओ झाला व्हायरल…

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । ‘खतरों के खिलाडी १०’ हा लोकप्रिय कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे, परंतु याआधी स्पर्धक करिश्मा तन्ना आणि अदा खान ‘नागीन’ या गाण्यावर नाचताना दिसले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन्ही अभिनेत्रींनी टीव्ही सीरियल ‘नागीन’ मध्ये दमदार अभिनय केला आहे.


View this post on Instagram

#karishmasharma and #adaakhan cool nagin dance for #khatronkekhiladi @colorstv #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on Feb 21, 2020 at 11:15pm PST

 

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये करिश्मा तन्ना आणि अदा खान चाहत्यांसमवेत सेल्फी घेताना दिसतात, पण जेव्हा चाहते त्यांच्या मोबाइलवर फोटो पाहतात तेव्हा त्यांना त्याअभिनेत्री ऐवजी साप दिसतात. यानंतर करिश्मा आणि अदा ‘नागिन’ अवतारात एकत्र नाचताना दिसतात. त्यानंतर त्यांच्यासमवेत आजूबाजूचे लोकही सामील होतात.

 

या वेळी ‘खतरों के खिलाडी १०’ मध्ये करिश्मा आणि अदा यांबरोबर तेजस्वी प्रकाश, अमृता खानविलकर, करण पटेल, शिविन नारंग,धर्मेश, भोजपुरी अभिनेत्री राणी चटर्जी, कॉमेडियन बलराज आणि आरजे मलिष्का यांचा समावेश आहे.’खतरों के खिलाडी १०’हा कार्यक्रम येत्या शनिवारपासून कलर्सवर चालू होणार आहे. आपण ते शनिवारी आणि रविवारी रात्री ९ वाजता पाहू शकता.यावेळीही सुप्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी हा शो होस्ट करत आहेत