Take a fresh look at your lifestyle.

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा ‘भूल भुलैया २’ च्या सेटवरचा रोमान्स करतानाचा व्हिडीओ लिक

हॅलो बॉलिवूड ऑनलाइन । बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने काही दिवसांपूर्वी जयपुरमध्ये ‘भूल भूलैया २’ च्या शूटिंगला सुरुवात केली होती. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओही शेअर केला असून त्यामध्ये तो ‘बाबा’ लूकमध्ये दिसला होता. आता सेटवरून फोटो आणि शूटिंग चे व्हिडीओ लीक होत आहेत, यात कार्तिक चित्रपटाची प्रमुख अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत रोमांस करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये एक भव्य किल्ला दिसत आहे. त्यावेळचं कुर्ता घातलेला कार्तिक आणि कियारा सिल्वर रंगाच्या लेहेंगामध्ये नाचत आहेत. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.याशिवाय आणखीही काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये कार्तिक आणि कियारा बाइक वर बसलेले आहेत.

 प्रियदर्शन दिग्दर्शित ‘भूल भूलैया’ हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. १९९३ सालच्या मल्याळम चित्रपट ‘मनिचित्राथाजु’ चा अधिकृत रीमेक होता. ‘भूल भुलैया २’ अनीस बज्मी दिग्दर्शित आहे, जो ३१ जुलै २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.