Take a fresh look at your lifestyle.

‘भूल भुलैया २’ साठी कार्तिकने चालविली ई-रिक्षा

हॅलो बॉलिवूड ऑनलाइन । कार्तिक आर्यन सध्या जयपूरमध्ये आपल्या आगामी ‘भूल भूलैया २’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी आणि तब्बू देखील कार्तिकच्या बरोबर दिसणार आहेत.या शूटिंगचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर आले आहेत. अशा परिस्थितीत कार्तिक आर्यनने ई-रिक्षा चालवल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये कार्तिक आर्यन आपल्या टीमसह ई-रिक्षा चालवताना दिसत आहे. यासह, एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये तो दिग्दर्शक अनीज बज्मी यांच्यासह राजवाड्याच्या छतावर बसलेला आहे आणि लोक त्याला पाहण्यासाठी खाली जमले आहेत.

नुकताच कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.ज्यामध्ये दोघे रोमांस करताना दिसत आहेत. याशिवायही कार्तिकचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत.


View this post on Instagram

Shooting of #bhoolbhulaiyaa2 @kartikaaryan @kiaraaliaadvani

A post shared by The Kartik Lovers (@kartik.lovers) on Feb 27, 2020 at 7:32am PST

 

 ‘भूल भूलैया २’ अक्षय कुमारच्या ‘भूल भूलैया’ चा सिक्वल आहे. या चित्रपटात विद्या बालन आणि शायनी आहुजा यांनी अक्षयसोबत महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. ‘भूल भूलैया २’ ३१ जुलै २०२०रोजी प्रदर्शित होईल.

Comments are closed.

%d bloggers like this: