Take a fresh look at your lifestyle.

‘ओ पुष्पा आय हेट टीयर्स’मधून कृष्णा अभिषेक करणार कमबॅक

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । प्रसिद्ध टीव्ही कॉमेडियन आणि अभिनेता कृष्णा अभिषेक पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘ओ पुष्पा आई हेट टीयर्स’, असे कृष्णा अभिषेकच्या या चित्रपटाचे नाव आहे. चित्रपटाचे नाव राजेश खन्ना यांच्या प्रसिद्ध संवादावर ठेवले गेले आहे. कृष्णा अभिषेक सोबत या सिनेमात जे कार्तिक, अर्जुमन मुगल आणि अनुस्मृती सरकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन दिनकर कपूर यांनी केले आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. ट्रेलरमध्ये असे दिसून आले आहे की पुष्पाला आपल्या पतीला घटस्फोट घ्यायचा आहे, तिचा नवरा दुसर्‍यावरही प्रेम करतो पण पुष्पाला घटस्फोट देऊन ते रस्त्यावर येऊ इच्छित नाही कारण सर्व मालमत्ता पुष्पाच्या नावे आहे. पुष्पाच्या नवऱ्याने तिला ठार मारण्याची योजना आखली ज्याची सुपारी मिळाली कृष्णा अभिषेकला. चित्रपटात कृष्णाचे नाव श्याम आहे, पुष्पाला मारण्याऐवजी तो तिच्या प्रेमात पडतो. यानंतर काय होते, आपण सर्व चित्रपटात पहाल.

 

कृष्णा अभिषेकचा ‘ओ पुष्पा आय हेट टीयर्स हा चित्रपट येत्या २८ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. कृष्णा अभिषेक सध्या द कपिल शर्मा शोमध्ये सपनाच्या भूमिकेत दिसत आहे. यापूर्वी कृष्णा कॉमेडी नाइट्स को बचाओ, कॉमेडी सर्कस, द ड्रामा कंपनी यासारख्या विनोदी कार्यक्रमांमध्ये दिसला आहे. कृष्णाने अभिषेकने याआधी अभिनेता अक्षय कुमार यांच्याबरोबर ‘एंटरटेनमेंट’, अभिषेक बच्चनसोबत ‘बोल बच्चन’ आणि ‘क्या कूल है हम ३’ या सिनेमांमध्येही काम केले आहे.

Comments are closed.