Take a fresh look at your lifestyle.

कृती सॅनॉनच्या या फोटोने वेधून घेतले सर्वांचे लक्ष !!!

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री कृती सॅनॉन तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या स्टाईलमुळेही चर्चेत आहे. अलीकडेच तीने ‘पानीपत’ आणि ‘हाऊसफुल ४’ चित्रपटातील व्यक्तिरेखाने बरीच चर्चा रंगविली . याशिवाय तिने सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या कॅलेंडर शूटमध्येही आपल्या पोझसह सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पण याशिवाय या अभिनेत्रीचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री उदास चेहरा घेऊन पायर्‍यावर बसलेली दिसत आहे. या सर्वांमध्ये लोकांचे लक्ष वेधून घेत होता तो या अभिनेत्रीचा बेबी बंप. या फोटोत कृती सॅनॉन एका वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे.

कृती सॅनॉनने तिच्या आगामी मिमी चित्रपटासाठी हा लुक केला आहे, ज्यामध्ये ती गर्भवती महिला म्हणून दिसली आहे. कृतीचा हा चित्रपट सरोगसीवर आधारित आहे. कृतीचा हा चित्रपट २०११ च्या राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘मला आई व्हायचंय ‘ या चित्रपटाचा रीमेक आहे. मिमी या चित्रपटातील कृतीच्या भूमिकेबद्दल बोलताना एका सूत्रांनी सांगितले की, “तिला या चित्रपटासाठी आपले वजन १५ किलोने वाढवावे लागले,तिला आपल्या आहारात जास्त कार्बोहायड्रेट आणि चरबीयुक्त पदार्थ खावे लागले. वजन वाढीसाठी तिला चीज, मिठाई, तूप, जंक फूड, तळलेले पदार्थ , बटाटे आणि इतर बर्‍याच गोष्टी खाव्या लागल्या.तसेच दिवसातून बर्‍याच वेळा आहार घ्यावा लागला”.

अभिनेत्री कृती सॅनॉनने ‘हीरोपंती’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटात टायगर श्रॉफ तीच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसला होता. यानंतर ती ‘दिलवाले’, ‘बरेली की बर्फी’, ‘लुका छूप्पी’, ‘हाऊसफुल 4’ आणि ‘पानीपत’ यांसारख्या बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसली.

 

 

Comments are closed.