Take a fresh look at your lifestyle.

स्टॅन्ड अप कॉमेडियन ‘कुणाल कामरा’ची देशभर चर्चा; वाचा का तीन विमानसेवा कंपन्यांनी केले त्याला ‘बॅन!’

सोशल कट्टा । टीव्ही अँकर, रिपब्लिक टीव्हीचे संस्थापक आणि पत्रकार अर्नब गोस्वामी सगळ्यांना माहितीच आहेत. प्रसिद्ध राजकीय स्टॅन्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा याच्याशी त्यांची पुन्हा एकदा भेट झाली. विचारलेल्या प्रश्नांना नीट उत्तरं न दिल्याने मला असं करायची वेळ आली असं कामरा म्हणाला. टीव्ही चॅनेलवर रोहित वेमुलाची जात काढल्याचा जवाब विचारण्यासाठीच मी असा प्रकार केल्याचं स्पष्टीकरण कामराने व्हिडीओमध्ये दिलं आहे. संपूर्ण घटनेचे चित्रीकरण केले आणि सोशल मीडियावर ते पोस्ट केले, जिथे त्यांनी गोस्वामी यांना ‘भ्याड’ म्हटले होते.

काम्राने बुधवारी सकाळी ट्विट केले, “अर्णब गोस्वामी आज सकाळी लखनऊहून परत येत असताना पुन्हा माझ्या विमानात आले होते. मी विनम्रपणे विचारले की प्रामाणिकपणे चर्चा करायची असेल तर मला बोलायचे आहे, मला त्यांनी हाताने इशारा करून दूर जाण्यास सांगितले, मी तसं केलं “

स्टॅन्ड अप कॉमेडिअन कुणाल कामरा आणि पत्रकार अर्णब गोस्वामी एकाच विमानातून प्रवास करत होते. या प्रवासावेळी कुणाल कामराने विचारलेल्या काही प्रश्नांकडे अर्णब गोस्वामीने दुर्लक्ष केलं. त्याच्या या वागण्यावर संतापलेल्या कुणाल कामराने अर्णबला प्रश्न विचारणारा एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

या प्रकाराची गंभीर दखल इंडिगो एअरलाईन्स आणि एअर इंडियाने घेतली असून कुणाल कामराच्या विमानप्रवासावर निश्चित काळासाठी बंदी घालण्याचा निर्णय दोन्ही कंपन्यांनी घेतला आहे. हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत खेद व्यक्त केला असून प्रवाशांच्या शांततेशी आणि सुरक्षिततेशी खेळण्याचा प्रकार निंदनीय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या प्रकारावर कारवाई करण्याची विनंती केल्यानंतरच एअरलाईन्स कंपन्यांनी हा निर्णय घेतला.

Comments are closed.

%d bloggers like this: