Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

लिटल चॅम्प्स फेम प्रथमेश आणि मुग्धा एकमेकांच्या प्रेमात; नात्याची कबुली देत म्हणाले, ‘आमचं ठरलंय!’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 16, 2023
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Prathamesh_Mugdha
0
SHARES
97
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’च्या पहिल्या सिजनमध्ये प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, रोहित राऊत यांनी आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. आज हे सर्व संगीत क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवत प्रगती करत आहेत. हा सीजन संपून बरीच वर्ष झाली असली तरीही हे ५ छोटे उस्ताद प्रेक्षकांच्या आजही मनात घर करून बसले आहेत. यांपैकी आता दोघांनी आपल्या चाहत्यांना एक सुखद धक्का देणारी बातमी दिली आहे. प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी आपल्या नात्याची कबुली देत ‘आमचं ठरलंय’ अशी पोस्ट केली आहे. जी पाहून सोशल मीडियावर नेटकरी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Prathamesh Umesh Laghate (@prathamesh_laghate_adhikrut)

प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी आज त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी एकमेकांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘अनेकांच्या आमच्याकडून एका बातमीची अपेक्षा आहे. तर शेवटी आमचं ठरलंय’. आधी तर हि पोस्ट पाहून यांचं नक्की काय ठरलंय याबाबत चर्चा सुरु झाली. पण यानंतर जेव्हा कमेंट बॉक्समध्ये ;लिटल चॅम्प्सची सूत्रसंचालिका स्पृहा जोशी, परीक्षक अवधूत गुप्ते, अभिनेत्री सायली संजीव, सुकन्या मोने यांच्या कमेंट्स पडू लागल्या, तेव्हा नक्की झालं कि यांचं नेमकं काय ठरलंय.

View this post on Instagram

A post shared by Mugdha Bhagawan Vaishampayan (@mugdhabhagawan5)

तर प्रथमेश आणि मुग्धा एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असून येत्या काळात लवकरच ते विवाहबद्ध होणार आहेत. त्यांच्या कुटुंबांमध्ये तशी बोलणी सुरु आहे. प्रथमेश आणि मुग्धा एकत्र अनेक डुएट रिक्रिएशन सॉंग व्हिडीओ बनवताना दिसतात. त्यांचं युट्युब चॅनलदेखील आहे आणि त्यांचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. प्रथमेश आणि मुग्धा यांनी दिलेल्या बातमीने त्यांचे चाहते प्रचंड खुश झाले आहेत. आता सर्वांना त्यांच्या विवाह सोहळ्याची उत्सुकता आहे. शिवाय या पाच छोट्या उस्तादांपैकी रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड यांची आधीच लग्न झाली आहेत. आता प्रथमेश आणि मुग्धा यांचंदेखील लग्न होईल. पण आर्या आंबेकर लग्न कधी करणार असाही प्रश्न काही नेटकरी विचारत आहेत.

Tags: Instagram PostMarathi SingerRelationshipViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group