Take a fresh look at your lifestyle.

कार्तिक आणि साराचे नवीन कॅची गाणे ट्रेंडिंग, जुनाच ट्विस्ट पण नवीन जोडी !

गाणी बिणी | लव्ह आज कल चा दुसरा भाग येतोय. त्याच्या ओरिजिनल चित्रपटांप्रमाणेच यातही चान्गली गाणी घालण्याचा निर्माते अणे दिग्दर्शकाचे प्रयत्न चालू आहेत, याला यशही येताना दिसतंय. जवळपास सगळीच गाणी रिमेक करत असताना संगीतकार प्रीतमने त्याचंच जुनं गाणं ‘ट्विस्ट’ नव्या पद्धतीनं प्रेक्षांकांसमोर आणलं आहे.

कार्तिक आर्यन आणि सारा आली खान यावर थिरकताना दिसतील. चित्रपटाचे संगीत प्रीतम ने दिलेलं असून, अरिजित सिंगने ते गायलं आहे. इम्तियाज अली चित्रपटाचे दिग्दर्शन करतोय. गाण्याच्या कोरिओग्राफीविषयी बारुईचं चर्चा सोशल मीडिया वर होताना आपल्याला दिसते.

चित्रपटाच्या ट्रेलर ला युट्यूबवर भरपूर व्युव्हज मिळाले असुन चित्रपटाला यश मिळेल अशी निर्मात्यांना खात्री आहे. युवा हिट गाण्यांच्या जोरावर जुन्या चित्रपटाच्या यशाची पुनरावृत्ती होते का हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.