दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू करणार रोहित शेट्टीच्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण ??
हॅलो बॉलिवूड ऑनलाइन । दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू आजकाल त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या यशाची चव चाखत आहे. त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या आधी तो कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. त्याने सोशल मीडियावर फोटोही शेअर केले आहेत. महेश बाबूच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल नेहमीच कयास सुरू असतात. दरम्यान, तामिळ अभिनेत्याशी सुप्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला यांनी संपर्क साधल्याची बातमी येत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, साजिदला महेश बाबूंना त्याच्या एका सुपरहिट फ्रँचायझीसाठी साइन करायचे आहे.कदाचित या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करू शकतात. यात त्याच्या बरोबर रणवीर सिंग ही दिसू शकतो. मात्र अद्यापही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
विशेष म्हणजे महेश बाबू आणि रणवीर सिंग यांनी यापूर्वीही एका जाहिरातीमध्ये एकत्र काम केले आहे. दोघांची बॉन्डिंग प्रेक्षकांना चांगलीच आवडली.
महेश बाबूच्या बॉलिवूड चित्रपटाचे चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत, परंतु त्यांनी अनेक वेळा सांगितले आहे की त्यांना दक्षिणेतील चित्रपटांकडून खूप प्रेम आणि स्टारडम मिळाले आहे. ते त्यात आनंदी आणि समाधानी आहेत.
Comments are closed.