Take a fresh look at your lifestyle.

मलायका आणि अर्जुन कपूरची सोबत पार्टी…

0

चंदेरी दुनिया । अर्जुन कपूर व मलायका अरोरा यांचे नाते कुणापासूनही लपून राहिलेले नाही. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत, हेही नव्याने सांगण्याची गरज नाही. हे कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. अर्थात दरवेळी या सगळ्या अफवा असल्याचे सांगून अर्जुन व मलायका या चर्चा धुडकावून लावतात. पण आता हे नाते बरेच पुढे गेले आहे. केवळ मलायका-अर्जुन यांच्यातच नाही तर एकमेकांच्या कुटुंबाशीही दोघांची जवळीक वाढत आहेत. होय, अर्जुनने मलायकाच्या मॉम डॅडसोबत ख्रिसमस साजरा केला, यातच सगळे आले.

ख्रिसमसनिमित्त मलायकाच्या आईच्या घरी एक छोटीशी पार्टी आयोजित केली गेली होती. मलायका व अर्जुन दोघेही एकत्र या पार्टीला पोहोचले. दोघेही वेगवेगळ्या कारमध्ये आलेत. पण दोघांनीही एकत्र घरात एन्ट्री घेतली. याचे काही फोटो समोर आले आहेत.

कपूर कुटुंबाने आधीच मलायका व अर्जुनच्या नात्याला परवानगी दिली आहे. आता कदाचित अरोरा कुटुंबानेही हे नाते मान्य केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मलायका व अर्जुनचे नाते आॅफिशिअल झाले तर आश्चर्य वाटायला नको.

अर्जून व मलायकाची रोमॅन्टिक केमिस्ट्री सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. सुरुवातीला दोघांनीही आपले नाते जगापासून लपवून ठेवले. पण अरबाजसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अगदी बिनधास्त अर्जुनसोबत फिरू लागली.

Leave a Reply

%d bloggers like this: