Take a fresh look at your lifestyle.

आर्चीचा नवा ‘मेकअप’ टीझर प्रदर्शित !

0

चंदेरी दुनिया । नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटातून अभिनयच्या प्रवासाला सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत रिंकूला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. या पहिल्यावहिल्याच चित्रपटातून रिंकूने अनेकांच्या मनात घर केले. आता रिंकूचा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

रिंकूच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘मेकअप’ असे आहे. या चित्रपटात रिंकूसोबत अभिनेता चिन्मय उदगीरकर देखील दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रिंकू या चित्रपटात दोन वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहे. रिंकूचा हा बिनधास्त अंदाज तसेच तिचा हा ‘मेकअप’ कशासाठी आहे, यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागणार आहे. ७ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टीजर पाहण्यासाठी क्लीक करा https://www.youtube.com/watch?v=v6XpB0PSCAE

Leave a Reply

%d bloggers like this: