Take a fresh look at your lifestyle.

IIFA अवाॅर्ड मध्ये सुशांतची खिल्ली उडविणं शाहिद आणि शाहरुख ला पडले महागात 

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता आणि अष्टपैलू कलाकार अशी ओळख असणारे सुशांत सिंग राजपूत आता या जगात नाहीत. त्यांचा मृतदेह त्यांच्या वांद्रा येथील राहत्या घरी सापडला होता. त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हंटले जात आहे. यावरून सोशल मीडियावरून सध्या बॉलिवूडमधील नेपोटीझम ची चर्चा केली जात आहे. छोट्या शहरातून आलेल्या कलाकारांना जाणीवपूर्वक एकटे पाडले जाते अशी चर्चा सुरु आहे. सध्या एका पुरस्कार सोहळ्यात शाहिद आणि शाहरुख यांनी सुशांत सिंग राजपूत याची खाल्ली उडवली होती. तो व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमुळे या दोन्ही कलाकारांना चांगलेच धारेवर धरण्यात आले आहे.

प्रसिद्ध गायीका मालिनी अवस्थी या व्हिडीओमुळे संतापल्या आहेत. त्यांनी ट्विट करुन आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत, ‘जेव्हापासून हा व्हिडीओ पाहिला आहे हतबल झाले आहे, मनोरंजनाच्या नावाखाली हा असला बीभत्स रंग! निवेदनाच्या नावाखाली एखाद्या नवोदित कलाकाराचा या मोठ्या कलाकारांकडून अपमान कशा पद्धतीने स्विकार्य आहे,’ असे त्यांनी ट्विट केले आहे. त्यांचे ट्विट पाहून नेटकऱ्यांनी शाहिद आणि शाहरुखला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

 

त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हे ट्विट पाहून अनेकांनी शाहरुख आणि शाहिदवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी या अभिनेत्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं. वयाच्या ३४ केवळ ३४ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.