Take a fresh look at your lifestyle.

मलायकाने उघडले तिच्या ऑडिशनशी संबंधित रहस्य म्हणाली – जेव्हा ती १७ वर्षांची होती तेव्हा…

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने आपल्या नृत्य आणि शैलीने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मलायका अरोरा हिने शाहरुख खानसह दिल से चित्रपटामध्ये केलेला धमाकेदार डान्स लोकांना अजूनही आठवतो. आपल्या प्रतिभेच्या जोरवर मलायका अरोरा आज बोललीवूडमध्ये एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचली आहे. ती म्हणते की,इथपर्यंत पोहोचणे तिच्यासाठी अजिबात सोपे नव्हते.तिने सांगितले की, जेव्हा जेव्हा ती ऑडिशनसाठी जात असत,तेव्हा तिलाही बर्‍याच नकारांचा सामना करावा लागत असे.त्यावेळी ती चित्रपटसृष्टीत नवीन होती.

मलायका तिचे संघर्षाचे दिवस आठवत पुढे म्हणाली, “मला आठवते की मी बर्‍याच ऑडिशनमध्ये जात असे आणि माझी आई माझ्याबरोबर असायची. मी काम करायला सुरुवात केल्यावर मला बर्‍याच नकारांचा सामना करावा लागला. पण मी निराश झाले नाही आणि मी कधीही हार मानली नाही व प्रयत्न करत राहिले. जेव्हा मी माझी मॉडेलिंग कारकीर्द सुरू केली तेव्हा मी १७ वर्षांची होते आणि आज मी एक जज् म्हणून एका शोमध्ये आहे”. ती पुढे म्हणाली, “हे सोपे नव्हते. जेव्हा मी १५-१६ वर्षांची होते तेव्हा मला काय करावे हे माहित नव्हते आणि आजकाल ऑडिशनला येणारी मुलं त्यांना काय करायचं आहे ते खूप स्पष्टपणे मांडतात.”

मलायका अरोरा, टेरेन्स आणि गीता कपूर यांच्यासमवेत एका रिअलिटी डान्स शोमध्ये जज् म्हणून दिसणार आहेत.मलायका अरोरा २० वर्षांपूर्वी टेरेंस लुईसचीसुद्धा विद्यार्थिनी होती.याशिवाय सध्या मलायका अर्जुन कपूरसोबतच्या तिच्या नात्याबद्दलही बरीच चर्चेत असते. दोघांनीही आपलं नातं जाहीरपणे मान्य केलं आहे. पण दोघेही आपल्या लग्नाविषयी काहीही बोलले नाहीयेत. मलायका अरोराने एका खास मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, तिचे आणि अर्जुन कपूरचे लग्न झाल्यास ती त्याबद्दल लोकांना सांगण्यात मागेपुढे पाहणार नाही.


View this post on Instagram

 

Frolicking in the sun …… love this @raraavisbysonalverma pic @karanjohar #jaisalmer

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on Feb 19, 2020 at 9:19pm PST

 

Comments are closed.

%d bloggers like this: