Take a fresh look at your lifestyle.

‘मलंग’चा खिळवून ठेवणारा ट्रेलर तुम्ही पाहिलात का?

पहा दिशा पटानीचा बोल्डेस्ट बिकिनी अवतार !

फिल्मी दुनिया । आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर, कुणाल खेमू आणि दिशा पटानी यांच्या आगामी ‘मलंग’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये आदित्य राय कपूर आणि दिशा पटानी अतिशय दमदार स्टाईलमध्ये दिसत आहेत. चित्रपटाचे पोस्टर यापूर्वीच प्रसिद्ध झाले आहे. या पोस्टरला चाहत्यांचेही खूप प्रेम मिळाले. आता ‘मलंग ट्रेलर’चा ट्रेलर पाहता असे दिसते की हा यावर्षीचा सुपरहिट चित्रपट असेल. ‘मलंग’ चा ट्रेलर रिलीज होताच यूट्यूबवर ट्रेंड होत आहे

       ट्रेलर ला आत्तापर्यंत २४ तासात २ करोड वेळा पाहिलं गेलंय. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘एक व्हिलन’चे दिग्दर्शक मोहित सूरी यांनी केले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कुठेतरी ‘एक व्हिलन’ ची झलकदेखील दिसते. चित्रपटाची चारही मुख्य पात्रं ‘खलनायक’ भासत आहेत, तथापि या चित्रपटाचा खरा खलनायक कोण असेल याची कल्पना या चित्रपटाच्या रिलीजनंतरच कळू शकेल.

      हा चित्रपट 7 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. लव्ह रंजन यांनी निर्मिती केली असून या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सुरी यांनी केले आहे.