Take a fresh look at your lifestyle.

‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ टीझर झाला रिलीज, रजनीकांत दिसले बेयर ग्रील्सबरोबर अ‍ॅडव्हेंचर करताना…

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । साऊथचा सुपरस्टार रजनीकांत नुकताच ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ च्या शूटिंगसाठी चर्चेत आला होता. आता या बहुप्रतिक्षित एपिसोडचा टीझर समोर आला आहे. डिस्कव्हरी चॅनलने हे टीझर ट्विट केले आहे. ज्यामध्ये रजनीकांत अगदी वेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहे. या भागाची संपूर्ण शूटिंग कर्नाटकच्या बांदीपूर टायगर रिझर्व येथे झाली आहे.

डिस्कव्हरी चॅनलने टीझर शेअर करत कॅप्शनवर लिहिले आहे, ‘वाईल्डस्टार तज्ज्ञ बेयर ग्रिल्स सुपरस्टार रजनीकांतला अ‍ॅक्शन पॅक अ‍ॅडव्हेंचरसह घेऊन येत आहे’या टीझरला चाहत्यांना खूप पसंती आहे, तसेच हे सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल होत आहे. यापूर्वी ग्रीलसमवेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या कार्यक्रमात हजेरी लावले होते, त्यांनाहि चांगलीच पसंती मिळाली होती. या टीझरबद्दल बोलताना, त्यात बेयर ग्रील्स आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्या जंगलातील वास्तव्याचे काही क्षण दाखविण्यात आले.

 

यावर्षी जानेवारीत सुपरस्टार रजनीकांतने कर्नाटकातील बांदीपूर टायगर रिझर्व येथे या कार्यक्रमाचे शूट केले. बांदीपुर व्याघ्र प्रकल्प हा ८७४ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला एक राष्ट्रीय उद्यान आहे. शूटिंगदरम्यान रजनीकांत जखमी झाल्याचीही एक अफवा होती. यानंतर, रजनीकांतने सांगितले की तो ठीक आहे, त्याने थोडीसे खरचटले आहे.रजनीकांतचा हा खास भाग २३ मार्च रोजी रात्री ८ वाजता टीव्हीवर दिसणार आहे.

रजनीकांतच्या अगोदर बेयर ग्रिल्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत शूटिंगही केली. त्या भागाच्या माध्यमातून, पीएम मोदी यांनी संपूर्ण जगासमोर प्राणी संरक्षण आणि पर्यावरणीय बदलांविषयी चर्चा केली होती. उत्तराखंडमधील जिम कॉर्बेटच्या जंगलात पीएम मोदींच्या कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यात आले होते .

 

Comments are closed.

%d bloggers like this: