Take a fresh look at your lifestyle.

शंकर महादेवन यांनाही आवरला नाही मोह,कशाचा? पहा व्हिडीओ

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । कपाळावर उभा टीळा, कानाच्या पाकळ्यांवर पांढरा वर्तुळाकार आकारात लावलेला गंध, डोक्यावर मोरपीसांची पर्वताच्या आकाराची टोपी, चार पाच रुद्राक्षांच्या अन् दोन ते तीन कवड्याच्या माळा, त्या गोल गंधाला भगव्या रंगाच्या शेंदुराची किनार, गळ्यात अगदी बोटभर उंचीची पितळ्याची विठ्ठल-रखुमाई आणि हातात दोन टाळं आणि चिपळ्या, अंगावर भगवी शाल किंवा फेटा वजा कापड, खाली धोतर, पायात वाहाण असं वासुदेवाचं रुप आपण अनेकदा पाहिलं असेल. कधीतरी सकाळी शहरांमध्ये दिसून येणारे वासुदेव ग्रामीण भागात तर अगदी नित्याने दिसतात. मात्र मुंबईमध्ये असंच एका वासुदेवाला ऐकण्याचा मोह गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनाही आवरता आला नाही. शंकर महादेवन यांनीच या वासुदेवाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे तो आता चांगलाच व्हायरल होतो आहे.

शहरांत इमारतीखाली वासुदेव आल्यावर अनेकदा लहान मुले धावत त्याला बघायला खाली जातात. असंच काहीसं शंकर महादेवन यांच्याबाबतही झालंय. शंकर महादेवन यांच्या इमारतीखाली रस्त्यावरुन जाणाऱ्या वासूदेवाचा आवाज ऐकला आणि ते खाली उतरले आणि त्या वासूदेवाबरोबर गप्पा मारु लागले. त्यानंतर त्यांनी वासुदेवाला गाणं गाण्याची विनंतीही केली. यानंतर शंकर महादेवन यांनीच हा व्हिडिओ शेअर केला आहे.

सुरुवातीला या व्हिडिओमध्ये शंकर महादेवन हे वासुदेवाशी बोलत असताना दिसतात. “मी पोपट विधाते आहे. मी वयाच्या ११ व्या वर्षापासून असा वासुदेव म्हणून फिरतोय,” असं ही व्यक्ती शंकर महादेवन यांना व्हिडिओमध्ये सांगाताना दिसत आहे. त्यानंतर महादेवन त्याच्या डोक्यावरअसलेल्या विठ्ठल रखु माईची मुर्ती पाहून विधातेंचं कौतुक करतात. “हे विधाते साहेब रस्त्यावर गाणं गात होते. ते इतकं छान गातं होते मी विचार केला त्यांचा व्हिडिओ शूट करुन तुमच्यापर्यंत पोहचवावा. आपल्या देशात किती कला आहे हे पाहा,” असं म्हणत शंकर महादेवन यांनी या वासुदेवाला गाणं गण्याची विनंती केली “हरे विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा पंढरीनाथा… रामकृष्ण हरी बोला” अशी अभंगाची ओवी वासुदेव गाऊन दाखवतो. एक दोन वेळा शंकर महादेवनही वासुदेवाला गाण्यात साथ करताना दिसतात.