Take a fresh look at your lifestyle.

प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक सोबत छेडछाड !

टीम, हॅलो बॉलीवूड । पुण्यात एका कार्यक्रमाच्या दरम्यान संतोष पोटे, सुनीता पोटे आणखी एक जण यांच्यावर मराठी अभिनेत्री मानसी नाईक हिने छेडछाडीचा आरोप करत पोलिसात गुन्हा नोंदवला आहे. पुण्यातील शिरुर तालुक्यात रांजणगाव येथे मानसी वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रमासाठी गेली होती. पुण्यातील युवासेना जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कार्यक्रम सादर करत असताना एका अज्ञात व्यक्तीने तिच्यासोबत गैरकृत्य केली. तसेच त्या व्यक्तीने तिला मंचाजवळ जाऊन धमकवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मानसीकडून करण्यात आला आहे.

  मुंबईतील साकिनाका पोलीस स्थानकात मानसी नाईक हिने तक्रार दाखल केली आहे. साकिनाका पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी रांजणगाव पोलिसांकडे सोपवली आहे. दरम्यान या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.

   ऐका मानसी नाईक यांचे म्हणणे