Take a fresh look at your lifestyle.

लक्ष वेधून घेण्यासाठी कमेंट्स करणं बंद करा; अभिनेता आशय कुलकर्णीने केली ट्रोलर्सची बोलती बंद

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सोशल मीडियाचा काळ आहे. त्यामुळे सर्व कलाकारमंडळी सोशल मीडियावर सक्रीय असतात. अनेकदा हे कलाकार आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधतात. प्रेक्षक आणि चाहतेसुद्धा या माध्यमातून त्यांचे कौतुक करतात. मात्र आजकाल नेटीझन्सकडून सोशल मीडियाचा वापर कलाकारांना ट्रोल करण्यासाठी केला जातोय. कलाकारांचं खाजगी आयुष्य असो किंवा मग एखादा फोटो, व्हिडीओ.. लोक सर्रास कलाकारांना ट्रोल करताना दिसतात. यावेळी अभिनेता आशय कुल्कर्णीसोबतही असच काहीस घडलं. मात्र अश्याने वेळीच ट्रोलर्सला उत्तर दिले आहे.

लॉकडाऊनमूळे ‘पाहिले ना मी तुला’ या झी मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या मालिकेचे शूटिंग सध्या महाराष्ट्राबाहेर गोव्यानजीक सुरु आहे. शूटिंगमधून वेळ मिळाला कि हे कलाकार धम्माल मस्ती करताना दिसतात. अन्य वेळी ऑनस्क्रीन असताना रसिकांचे मनोरंजन करणारे कलाकार सध्या ऑफ स्क्रीनही आपल्या रसिकप्रेक्षकांची वाहवा मिळवताना दिसत आहेत. एक मेजेशीर व्हिडीओ अभिनेता आशय कुलकर्णीनेही शेअर केला आहे.

मालिकेतील मुख्य अभिनेत्री तन्वी मुंडेसह आशयने हा व्हिडीओ तयार करीत चाहत्यांसह शेअर केला. व्हिडीओला ‘उचलले ना मी तुला. ५० किलो स्क्वॉट चॅलेंज’ असे हटके कॅप्शनही दिले आहे. मजेशीर अंदाजात शेअर केलेला हा व्हिडीओ चाहत्यांना मात्र फारसा रुचला नाही. त्यामुळे एका युजरने व्हिडीओवर ट्रोल करण्याच्या हेतूने कमेंट केली. मग ती वाचून आशयनेही त्याची बरोबर बोलती बंद केली आहे.

युजरने आशय आणि तन्वीचा हा मजेशीर व्हिडीओ पाहून म्हटले की, “लाईक आणि कमेंट मिळवण्यासाठी मराठी संस्कृतीची अशी इज्जत घालवू नका”. युजरची हि अशी कमेंट पाहून अभिनेता आशय कुलकर्णीला आपला राग अनावर झाला. तो संतापला आणि त्याने ट्रोल करणा-याला वेळीच रोखत जबदरस्त उत्तर दिले. “अजिबात संस्कृती आणि इज्जत घालवली नाहीये . आधी लक्ष वेधून घेण्यासाठी अशा कमेंट्स करणं बंद करा.” अशी प्रतिक्रिया देत अश्याने त्या ट्रोलरची पूर्ण हवाच काढून टाकली आणि इतर ट्रोलर्सची आपोआपच बोलती बंद केली आहे ‘पाहिले ना मी तुला’ ही मालिका दिवसेंदिवस रसिकांची लाडकी मालिका होत चालली आहे. अभिनेता शशांक केतकर, आशय कुलकर्णी, अभिनेत्री तन्वी मुंडे या तिघांच्याही या मालिकेत प्रमुख भूमिका आहेत.