Take a fresh look at your lifestyle.

‘हा’ मराठी अभिनेता पुन्हा दिसणार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत!

0

चंदेरी दुनिया । ‘खाकी’ चित्रपटातल्या ‘ कॉन्स्टेबल सावंत ‘ पासून ते ‘दगडी चाळ’ चित्रपटामधल्या ‘इन्स्पेक्टर काळे’ पर्यंत अनेक हिंदी, मराठी चित्रपटात कमलेश सावंत यांनी ‘पोलिसांची’ व्यक्तिरेखा साकारली. त्यातही ‘दृश्यम’ मधला त्यांचा ‘इन्स्पेक्टर गायतोंडे’ जास्त भाव खाऊन गेला. आता ‘सिनियर सिटीझन’ या नवीन चित्रपटात कमलेश सावंत पुन्हा एकदा पोलिसांची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

‘सिनियर सिटीझन’ या चित्रपटाची कथा निवृत्ती लष्कर अधिकारी अभय देशपांडे यांनी त्यांच्या पत्नीसोबत समाजात असणाऱ्या वाईट विचारांविरुद्ध पुकारलेल्या लढ्यावर आधारित आहे. कमलेश सावंत त्यांच्या या चित्रपटातील भूमिकेबद्दल सांगतात, ‘मी साकारत असलेला पी.आय.कोल्हे गडचिरोलीच्या छोट्या आणि ग्रामीण भाग असलेल्या जिल्ह्यातून आला आहे.

कॉन्स्टेबल म्हणून सुरुवातीला रुजू झालेला पी.आय.कोल्हे बढती घेत पी.आय पदापर्यंत पोहचतो. गरिबीतून वर आल्यामुळे त्याला लोकांच्या दुःखाची आणि कष्टाची जाणीव आहे. अतिशय साधा, हळवा आणि तितकाच कणखर असा हा पी. आय. कोल्हे बदली झाल्यामुळे मुंबईत येतो. मुंबईत आल्यानंतर एका वळणावर माझी आणि अभय देशपांडे सरांची भेट होते. त्यांच्या लढ्यात हा पी.आय. कोल्हे त्यांना कशी मदत करतो. हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर कळेल.’

Leave a Reply

%d bloggers like this: