हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती खुद्द त्यांनीच आपल्या चाहत्यांना दिली आहे. सोशल मीडिया ट्विटरवर ट्विट करीत त्यांनी कोरोना संसर्गाची बाधा झाल्याचे सांगितले आहे. मुख्य बाब म्हणजे अमोल कोल्हे यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोनही डोस घेऊन झाले आहेत आणि तरीही त्यांना कोरोना विषाणूची बाधा झाली असल्याचे समोर येत आहे. अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवर दोन ट्विट करीत एकात कोरोनाची लागण झाल्याची माहिती देत तर दुसऱ्यात आपल्या मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरे आणि कार्यक्रम पुढे ढकलल्याची माहिती दिली आहे.
कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोना सदृश लक्षणे दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसींचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. तरी टेस्ट केल्यानंतर माझा RT-PCR रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे. परंतु प्रकृती स्थिर आहे.
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) August 20, 2021
मराठी अभिनेता आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया ट्विटर हॅण्डलवरून संदर्भातील माहिती पुरविली आहे. यातील पहिल्या ट्विटमध्ये अमोल यांनी लिहिले आहे कि, कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोना सदृश लक्षणे दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसींचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. तरी टेस्ट केल्यानंतर माझा RT-PCR रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे. परंतु प्रकृती स्थिर आहे. या ट्विटसोबत रिप्लाय ट्विट करीत त्यांनी लिहिले आहे कि, डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे की त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत. निर्धारीत नियमांचे काटेकोर पालन करावे.
डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत.मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत.माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे की त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करून घ्यावी.शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत. निर्धारीत नियमांचे काटेकोर पालन करावे.
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) August 20, 2021
‘राजा शिव छत्रपती’ या स्टार प्रवाह वाहिनीवरील छोट्या पडद्यावरील ऐतिहासिक मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. यानंतर झी मराठीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेमध्ये ते संभाजीराजांची भूमिका साकारताना दिसले होते. पुढील पिढीला इतिहास ज्ञात असावा हे ध्येय उराशी बाळगून ते नेहमीच ऐतिहासिक क्षणांना आणि भूमिकांना न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात.
Discussion about this post