Take a fresh look at your lifestyle.

मराठी अभिनेत्री मेघा घाडगेच्या फोटोवर अश्लील कमेंट;तक्रार दाखल करण्यास केली टाळाटाळ,मेघाचा पोलिसांवर आरोप

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । आजकाल सोशल मीडियाचा वापर सऱ्हास होत असतो. अनेक अभिनेते आणि अभिनेत्री या सोशल मीडियाचा वापर त्याच्या फॅन फोल्लोविंग वाढविण्यासाठी करतात.अभिनेत्रींना फॉलॉव करणाऱ्या युजर्सची संख्याही खूप आहे.या अभिनेत्रींच्या सोशल मीडिया अकाउंटवर वाट्टेल त्या प्रतिक्रिया देणाऱ्या युजर्सचीही संख्या कमी नाही.या अभिनेत्रींना ट्रोल करणं, अश्लील कमेंट करणं अशा अनेक घटना समोर येत आहेत. असाच एक प्रकार सिनेसृष्टीतील मराठी अभिनेत्री मेघा घाडगे हिच्याबाबतीत घडल्याचं समोर आलं आहे.

मेघाने शेअर केलेल्या एका पोस्टवर एका युजरनं अश्लील कमेंट केली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मेघानं फेसबुकवर एका सहकलाकारासोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोवर स्वरूप पांडा नावाच्या युजरनं अश्लील अशी कमेंट केली आहे. अत्यंत घाणेरड्या अशा शब्दांत या युजरनं मेघाच्या या फोटोवर कमेंट्स केल्यानं तिच्या चाहत्यांनी या युजरला चांगलेच सुनावले आहे. इतरहि युजर्सनी आपली नाराजी व्यक्त करत स्वरूप पांडा या युजरला पोलिसांत देण्यात यावं अशी मागणी केली होती.

या घडलेल्या प्रकारानंतर मेघानं मिरा रोड वरील पोलीस ठाण्यात आपली तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवताना टाळाटाळ केल्याचा आरोप मेघानं केला आहे. तब्बल बारा तासांनी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. ‘पोलिसांनी मला कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. याप्रकरणी पोलिस ठाण्यातून मला कोणाचाही फोन देखील आलेला नाही. यामुळं मला खूपच त्रास होत आहे. अश्लील कमेंट करणारी जी कोणी व्यक्ती आहे,त्याला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी’, अशी मागणी मेघा घाडगे हिनं केली आहे.

Comments are closed.