Take a fresh look at your lifestyle.

मराठी अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे कोरोनाने निधन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे कोरोनामुळे काल दुपारी निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी ताप जाणवत असल्यामुळे त्या घरीच होत्या. या दरम्यान त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असता त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची तब्येत आणखी खालावल्याने काल त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. अभिलाषा पाटील यांनी अनेक मालिका तसेच चित्रपटांमध्ये काम केले होते. बापमाणूस या मालिकेत त्या पल्लवी पाटीलच्या आईच्या भूमिकेत झळकल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिलाषा पाटील काही दिवसांपूर्वी चित्रीकरणाच्या निमित्ताने बनारसला गेल्या होत्या. दरम्यान त्यांची तब्येत बिघडू लागली होती. त्यांना तिथे ताप येत असल्याने त्या मुंबईला लगोलग परतल्या. त्यांनी तातडीने स्वतःची कोरोनाची चाचणी केली. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्यांना कोरोनाची लागण झाली आहे हे समजले. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तब्येतीत कोणतीही सुधारणा नसून आणखीच बिघत असल्याने त्यांना आयसीयुत दाखल केले. गेले चार दिवस त्या आयसीयुतच होत्या. पण अखेर काल त्यांची प्राणज्योत मालवली.

 

बापमाणूस या मराठी मालिकेच्या दरम्यान पल्लवी आणि अभिलाषा यांची माय लेकीची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. पण आता अभिलाषा याना भूतकाळात संबोधताना होणार त्रास पल्लवीने सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. पल्लवीने लिहिले कि, ‘खूप मेहनत घेऊन काम करीत होतीस …. बापमाणूस ला आपण भेटलो होतो… आई होतीस माझी. . ” नुसतं एन्जॉय” असं म्हणून काम करायचीस … भूत काळात तुला संबोधताना त्रास होतोय…. जिथे असशील तिथे ही खूप कामं करत राहा… लव्ह यु ♥️ अभिलाषा पाटील आरआयपी

 

अभिनेत्री अभिलाषा पाटील यांनी प्रवास या चित्रपटात काम केले होते. तसेच बायको देता का बायको या चित्रपटात देखील त्या झळकल्या होत्या. तर सुशांत सिंग राजपूतची मुख्य भूमिका असलेल्या छिछोरे या चित्रपटात देखील त्या एका लहानश्या पण महत्वपूर्ण भूमिकेत दिसल्या होत्या. अभिलाषा पाटील यांच्या निधनाचा मराठी चित्रपटसृष्टीला चांगलाच धक्का बसला आहे. पल्लवी पाटील, संजय कुलकर्णी, मिलिंद धर्माधिकारी यांसारख्या कलाकारांनी त्यांच्या निधनाचा शोक व्यक्त करीत सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.