Take a fresh look at your lifestyle.

‘मिले हो तुम हमको’चं हे मराठी व्हर्जन तुम्ही ऐकलं का?

चित्रपटसृष्टी । रिमेक चा जमाना आलाय राव. बघाल तिकडे नुसता जुन्या गाण्यांचा सुळसुळाट झालाय. आता याला टॅलेंटची कमी म्हणायची की बॉक्स ऑफिसची गरज हे ही कळेना. असो याच धरतीवर हिंदीमधलं ३ वर्ष मागचं सुप्रसिद्ध गाणं ‘मिले हो तुम्ह हमको’ पुन्हा एकदा तयार करण्यात आलं आहे, ते हि मराठी भाषेत. खास गोष्ट म्हणजे हे गाणं सुद्धा ओरिजिनल गाण्याप्रमाणेच नेहा कक्करनेच गायलेलं आहे.

आपल्या आर्चीच्या म्हणजेच रिंकू राजगुरूच्या येऊ घातलेल्या ‘मेक अप’ या चित्रपटात हे गाणं वापरलं आहे. नेहा कक्करचे हे पहिले मराठी गाणे आहे. चित्रपट मराठीच्या मानाने चांगलं बजेट घेऊन आलेला दिसत आहे. गाणं चित्रपटातील कपलचं भांडण आणि नाराजी दाखवताना वापरलेलं आहे. ते किती कथेची गरज आणि किती व्यवसायचं गणित आहे, हे निर्मात्यानाच माहिती.

ओरिजिनल गाणं तरुणाईने खूप डोक्यावर घेतलं होत. टोनी कक्कर यांचं हे गाणं असून नेहा ने गायलेल्या या गाण्याला यूट्यूबवर जवळपास ९० कोटी व्युव्ह्ज आहेत, आता या मराठी आवृत्तीला किती लोक बघतात याचीच उत्सुकता आहे.