Take a fresh look at your lifestyle.

पाणी वाचविण्याच्या प्रयत्नात माकडाने केले असे काही, एक व्हिडिओ पोस्ट करून हा बॉलिवूड अभिनेता म्हणाला -“प्रत्येक मनुष्याला …”

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । बिग बॉसचा माजी स्पर्धक आणि अभिनेत्री अमिषा पटेल हीच भाऊ अभिनेता अश्मित पटेल ट्विटरवर खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. अलीकडेच त्याने आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. होळीच्या निमित्ताने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक वानर पाणी वाहू नये यासाठी प्रयत्न करीत आहे. अभिनेता अश्मित पटेल व्हिडिओने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहते या व्हिडिओवर बर्‍याच कमेंटही करत आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

 

हा व्हिडिओ अर करताना अभिनेता अश्मित पटेल याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हे खूप चांगले आहे, सर्वांनी ते पाहिलेच पाहिजे. आशा आहे की आपण सर्वांनी पाण्याशिवाय होळी खेळली असेल.होळीच्या शुभेच्छ आणि खूप प्रेम. ” अश्मित पटेल याने ट्विटरवरुन शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये माकड पाणी वाया जाण्यापासून वाचवण्यासाठी कसा प्रयत्न करीत आहे हे स्पष्टपणे दिसून येते.

अभिनेता अश्मित पटेल बद्दल बोलायचे झालया अश्मितने महेश भट्टचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली.’आप मुझे अच्छे लगने लगे हैं’, ‘राज’ आणि ‘आवारा पागल दिवाना’ सारख्या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. २००३ साली महेश भट्ट यांच्या ‘इंतेहा’ या चित्रपटाद्वारे अश्मित पटेलने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर या अभिनेत्याने अनेक चित्रपट केले. तथापि, ‘बिग बॉस ‘ च्या सीझन ४ मध्ये भाग घेत त्याने बरीच ओळख मिळविली.