Take a fresh look at your lifestyle.

मिस्टर अँड मिसेस कौशलचे मुंबईत जंगी स्वागत; सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील अत्यंत गाजलेले ट्रेंडिंग नवे कपल म्हणजे विकी कौशल आणि कॅटरिना कैफ. नुकतेच हे दोघे विवाह बंधनात अडकले आहेत. गेल्या ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानच्या बरवारा येथील सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला आणि कॅटरिना मिसेस कौशल झाली. त्यानंतर ते हनीमूनसाठी मालदीवला रवाना झाले होते आणि मंगळवारी १४ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ते मुंबईला परतले. मुंबईत येताच विमानतळावरच या लव्ह बर्डला पाहायला चाहत्यांची गर्दी जमली होती. दरम्यान चाहत्यांची त्यांचे जंगी स्वागत केले. प्रेमाचा वर्षाव केला. दरम्यान विमानतळावरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राजस्थानमध्ये पार पडलेलया या लग्न सोहळ्याचा थाट पाहून प्रसार माध्यमांसह सारेच थक्क झाले होते. मीनी हनीमून नंतर हे नव दांम्पत्य मुंबईत दाखल झाले आणि चाहत्यांना पहिल्यांदाच मिस्टर अँड मैसेस कौशल चे दर्शन झाले. खरतर हे नव जोडपं मुंबईत येणार ही खबर आधीच फोटोग्राफर्सला मिळाली होती. त्यामुळे मुंबई एअरपोर्टवर फोटोग्राफर्स आधीच जाऊन उभारले होते आणि मग काय? अखेर तो क्षण आला आणि विकी- कॅट हातात हात घालून विमानतळावर उतरले. यानंतर विमानतळाबाहेर पहिल्यांदा दोघंही हातात हात घालून एकत्र दिसले. दरम्यान या जोडप्याचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.

आपण सारेच जाणतो कि, विकी आणि कॅटच्या लग्नाबाबत अतिशय गोपनीयता राखण्यात आली होती. त्यामुळे दररोजचे उपडेट हे लग्न स्थळावरून बोलीत येत होते. मात्र लग्नानंतर कॅटरिनाने स्वतःच तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि सोशल मीडियावर उत्साह पसरला. त्यांच्या शाही सोहळ्याचे एकही फुटेज अद्याप बाहेर आलेले नाही.

 

शिवाय ते फुटेज कुणालाही मिळणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे. त्यांच्या लग्नाच्या बातमीनंतर सर्व चाहते खुश नाही डबलं टिबल खुश झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो व्हिडिओमध्ये विकी आणि कॅट एकमेकांच्या हातात हात घालून अत्यंत आनंदी दिसत आहेत. त्यांचा आनंद पाहून कुणीही आनंदी होईल. या नवं दांपत्याला त्यांच्या सुखी समाधानी प्रापंचिक आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा!