Take a fresh look at your lifestyle.

बिग बॉस १३चा हा फायनलिस्ट दिसणार जॅकलिनसोबत,व्हिडिओ झाला व्हायरल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बिग बॉस १३ मध्ये असीम रियाझने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. तो प्रथम उपविजेता बनला. त्याच्यात आणि विजेता सिद्धार्थ यांच्यात खूपच काई राहिले होत. प्रोफेशनबद्दल सांगायचे झाले तर, असिम एक मॉडेल आहे, त्याने वरुण धवन, शाहरुख खान आणि कतरिना कैफबरोबर बर्‍याच जाहिरातींमध्ये काम केले आहे. बिग बॉस १३ नंतर असीमला जास्तच प्रसिद्धी मिळाली आणि आता तो बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत काम करताना दिसणार आहे. असीम आणि जॅकलिन एका म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र दिसणार आहेत.

jacqueline fernandez instagram story

 

जॅकलिन फर्नांडिसने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती असिमबरोबर सराव करताना दिसली आहे. असीमनेही एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो मूनवॉक करताना दिसत आहे.मुंबई मिररच्या वृत्तानुसार हे गाणे टी-सीरिजने तयार केले आहे. तनिष्क बागची यांनी हे गाणे केलेले आहे. हे गाणे नेहा कक्कड़ यांनी गायले असून राधिका राव आणि विनय सप्रू यांनी दिग्दर्शित केले आहे.

जॅकलिनने मुंबई मिररला सांगितले की हे एक पैपी गाणे असेल ज्यामध्ये एक अतिशय सुंदर कथा सांगतली जाईल. शबीना खान या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन करत आहे. त्यांनी मॉर्डनबरोबर काही पारंपारिक स्टाईल देखील गाण्यात सामील केल्या आहेत.