Take a fresh look at your lifestyle.

‘तुम्ही दारूच्या दुकानांना परवाना देणे बंद केले तर मी त्यावर गाणे लिहिणे बंद करेल’,हनीसिंग ची प्रतिक्रिया

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । अश्लील गीतांद्वारेदारू पिण्याच्या प्रवृत्तीचा प्रचार केल्याचा आरोप केल्यानंतर पॉप स्टार आणि संगीतकार यो यो हनी सिंग म्हणतो की मद्यपान कोणत्याही समारंभ किंवा पार्टीचा अविभाज्य भाग आहे. तो म्हणाले की ज्या दिवशी दारूची दुकाने सुरू करण्यासाठी सरकार परवाने देणे बंद करेल, तेव्हा मी माझ्या गाण्यांमध्ये देखील दारूचा उल्लेख थांबवणार आहे. हनीसिंगने आपल्या ‘लोका’ या नवीन गाण्याच्या लाँचिंगवेळी मीडियाला भेट दिली. त्याच्या आधीच्या बऱ्याच गाण्यांप्रमाणेच ‘लोका’मध्येही दारूचा उल्लेख आहे.
त्याचवेळी, कारकीर्दीच्या अव्वल स्थानी असताना या गायकाला दारूच्या नशामुळे पुनर्वसन केंद्रात जावे लागले.
हा दावा फेटाळतांना गायक म्हणाला, “मी कधीही पुनर्वसन घेतले नाही. मला माहित आहे की माझ्याबद्दल आणि माझ्या आयुष्याबद्दल बर्‍याच बातम्या आल्या आहेत. आता मी मद्यपान करत नाही.”

 

तो पुढे म्हणाला, “तुम्ही जेव्हा पार्टी कराल तेव्हा दारू हे त्यामागचे सर्वात मोठे कारण बनते. आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आमचे सरकार दारूचे दुकान सुरू करण्याचा परवाने देतात, ज्या दिवशी ते परवाना देणे बंद करतील त्यादिवशी आम्ही आमच्या गाण्यांमध्ये त्याचा उल्लेख करणे थांबवू. ”
त्याच्या या गाण्यांमध्येही अश्लील गीत वापरल्याचा खटला दाखल करण्यात आला होता, त्यामुळे बरीच चर्चा देखील झाली होती.