Take a fresh look at your lifestyle.

असीम रियाझ आणि जॅकलिन फर्नांडिस यांचे ‘मेरे अंगने में’ हे गाणे झाले रिलीज,व्हिडिओ पहा

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । असीम रियाझ आणि जॅकलिन फर्नांडिस यांचे ‘मेरे अंगने में’ हे गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे होळीवर बनवले गेले आहे, यात अनुज सैनी आणि खुशी जोशी देखील दिसले आहेत. नेहा कक्कड आणि राजा हसन यांनी या गाण्याला आवाज दिला आहे, तर तनिष्क बागची यांनी तो रिमके केला आहे.

हे गाणे अल्पावधीतच ५ लाखाहून अधिक लोकांनी सोशल मीडियावर पाहिले आहे. ट्विटरवर #MereAngneMein ट्रेंड होत आहे आणि लोकांना असीम-जॅकलिनची केमिस्ट्री खूप पसंत होते आहे.हे गाणे राधिका राव आणि विनय सप्रू यांनी दिग्दर्शित केले आहे, तर गीत वायु यांनी लिहिले आहे.

असीम रियाज लोकप्रिय रिऍलिटी शो “बिग बॉस १३” मध्ये दिसला होता. त्याची फॅन फॉलोइंग हळूहळू वाढत गेली. त्याने अंतिम फेरीत सिद्धार्थ शुक्लाला कडवी झुंज दिली पण शेवटी सिद्धार्थ जिंकला.


View this post on Instagram

 

The trophy has come home!

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla) on Feb 15, 2020 at 1:42pm PST

 

असिम लवकरच दुसर्‍या एका म्युझिक व्हिडिओमध्ये हिमांशी खुरानासोबत दिसणार आहे. हे गाणे नेहा कक्कड़ गायले आहे. बिग बॉसच्या घरात असिम आणि हिमांशीची पहिल्यांदा भेट झाली. यानंतर दोघांनीही शोमध्येच आपलं प्रेम व्यक्त केलं.

 


View this post on Instagram

 

@iamhimanshikhurana#asimriaz#asimanshi 🙃🙃

A post shared by Asim Riaz (@asimriaz77.official) on Mar 8, 2020 at 12:44am PST