Take a fresh look at your lifestyle.

पारस छाब्रा आणि माहिरा शर्मा यांचे गाणे झाले रिलीज, ‘बिग बॉस १३’ ची केमिस्ट्री झाली फेल

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । ‘बिग बॉस १३’ मधील रोमान्सद्वारे चाहत्यांना आनंद देणारे पारस छाबरा आणि माहिरा शर्मा यांचे लेटेस्ट गाणे ‘रेन्स’ नुकतेच प्रदर्शित झाले आहे. टोनी कक्कर यांनी संगीतबद्ध केलेल्या या रोमँटिक गाण्याला सोशल मीडियामध्ये विविध प्रतिक्रिया मिळत आहेत, ज्यामुळे त्यांची केमिस्ट्री फ्लॉप झाल्याचे दिसत आहे.

बिग बॉसमधून प्रसिद्धी मिळालेल्या पारस आणि माहिरा ही जोडी प्रेक्षकांचे संपूर्ण हंगामात मनोरंजन करत राहिली. शो नंतरही पारस टीव्हीवर मॅरेज विथ मीच्या माध्यमातून हजेरी लावतोय, तर माहिराबरोबर आलेल्या या गाण्यामध्ये काही खास दाखवले नाही. या गाण्याबद्दल बोलायचे , तर याचे संगीत टोनी कक्कर यांनी दिले असून आवाज निखिल डिसूझा यांनी दिला आहे.

गाण्याची कहाणी लव्ह बर्ड्सभोवती फिरते. पारस आणि माहिराच्या जोडीचा प्रणय यामध्ये दाखविला गेला आहे आणि प्रेम अयशस्वी असल्याचे दर्शविले गेले आहे, जे प्रेक्षकांना विशेष आवडत नाहीत. जरी अनेकांनी सोशल मीडियात या गाण्याचे कौतुक केले असले तरी गाण्याचे चित्रण काहीसे गोंधळात टाकणारे ठरणार आहे.

या गाण्यामध्ये सर्व काही अगदी जलदपणे घडत आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना जोडून ठेवण्यात अपयशी ठरले आहे. गाण्याच्या पटकथेला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. माहिरा संपूर्ण गाण्यात रडताना दिसली आहे आणि पारसचा अभिनय पाहून भावना कमी हसायला जास्त येतंय. तथापि, या दोघांचे चाहते आहेत त्यांस हे खास आवडले असेल, तर काही प्रेक्षकांनी त्यांची खिचाई केली आहे.