Take a fresh look at your lifestyle.

सिड-नाझच्या म्युझिक व्हिडिओ ‘भुला देगा’ चे पहिले पोस्टर रिलीज

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । बिग बॉस १३ मध्ये सिद्धार्थ शुक्लाने विजेतेपदाची नोंद केलीच पण त्या बरोबरच शहनाज गिल आणि प्रेक्षकांची मनेही जिंकली. सिड-नाझ ही जोडी लोकांच्या हृदयावर राज्य करणारी आहे आणि पुन्हा एकदा ते दोघे एकत्र दिसणार आहे.

 

गायक दर्शन रावल यांच्या नवीन रोमँटिक म्युझिक व्हिडिओमध्ये शहनाज गिल सिद्धार्थ शुक्लाबरोबर दिसेल. नुकताच या व्हिडिओचा फर्स्ट लूक प्रसिद्ध झाला असून अवघ्या एका तासात ३१ हजाराहून अधिक लाईक्स या पोस्टवर आल्या आहेत. पोस्टरमध्ये शहनाज आणि सिद्धार्थ एकमेकांचे हात पकडून मोठ्या प्रेमाने एकमेकांकडे पहात आहेत.

 

 

 

बिग बॉस दरम्यान सिद्धार्थ आणि शहनाजची जवळीक वाढली, त्यानंतर दोघांच्या चाहत्यांनी या जोडीला सिड-नाझ हे नाव दिले. शहनाज ही नेहमीच चुलबुली आणि बडबड करणारी आहे, तर सिद्धार्थ चा स्वभाव सिरियस आणि कमी बोलणारा आहे. यामुळेच या दोघांचा अनोखा कॉम्बो चाहत्यांना आवडला.

 


View this post on Instagram

 

Back Again #myfirstpost

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla) on Feb 25, 2020 at 2:03pm PST

 

या क्षणी प्रत्येकजण उत्सुकतेने या गाण्याच्या रिलीजच्या प्रतीक्षेत आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की ‘सॉन्ग भुला देगा’ लवकरच रिलीज होऊ शकेल.

 

Comments are closed.