Take a fresh look at your lifestyle.

‘बागी ३’ चे नवीन गाणे रिलीज,दिशा करणार मादक अदांनी घायाळ

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरचा बागी ३ लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात टायगर आणि श्रद्धा सोबतच अंकिता लोखंडे आणि रितेश देशमुख हे हि महत्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये टायगर श्रॉफची मस्त अ‍ॅक्शन दिसत आहे. चित्रपटाची दोन गाणी रिलीज झाली असून आता ‘डू यू लव मी’ हे तिसरे गाणे प्रसिद्ध झाले आहे.

‘बागी ३’ च्या नवीन ह्या डान्स नंबर मध्ये दिशा पाटनी किलर मूव्हज दाखवत आहे. या गाण्यात दिशाबरोबर टायगर श्रॉफसुद्धा दिसला आहे. हे गाणे निकिता गांधी यांनी गायले आहे. दिशाच्या डान्स मूव्हज सर्वांना खूप आवडल्या आहेत. सोशल मीडियावर सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत.टायगर श्रॉफच्या अ‍ॅक्शनला या वेळेस पूर्वीपेक्षा जास्त व्युव्हज मिळाले आहेत. ट्रेलरला ७० दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. आता प्रत्येकजण चित्रपटाची वाट पाहत आहे.

टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांचे बागी ३ चे पहिले गाणे ‘दस बहाने २.० ‘ रिलीज झाले. बागी ३ मार्च मध्ये रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले असून नाडियाडवाला ग्रँडसन यांच्यासमवेत फॉक्स स्टार स्टुडियोज ने निर्मिती केली आहे.