Take a fresh look at your lifestyle.

‘नटसम्राट श्रीराम लागू’ यांच्या नावे देणार पुरस्कार !

महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाची घोषणा !

महाराष्ट्रभूमी । खरा ‘नटसम्राट’ अशी ओळख असलेले दिवंगत ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या नावे ‘नटसम्राट श्रीराम लागू’ पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने केली आहे. वृत्तवाहिनी एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

   शंभर पेक्षा जास्त चित्रपट व नाटकात अभिनय कौशल्य दाखवलेल्या डॉ. श्रीराम लागू यांचं डिसेंबर २०१९ मध्ये निधन झालं. पिंजरा चित्रपटातून ते प्रसिद्धीस आले होते. रंगभूमीवरचा नटसम्राट म्हणून त्यांची ओळख होती. श्रीराम लागू हे अभिनयाचं चालतंबोलतं विद्यापीठ होतं. रंगभूमी, चित्रपटसृष्टी यामध्ये त्यांनी दिलेलं योगदान महत्त्वाचं आहे.

   लागूंच्या याच योगदानाचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. रंगभूमीवर अतुलनीय कामगिरी करणाऱ्या कलाकाराला नटसम्राट श्रीराम लागू पुरस्कार देऊन त्यांचा जीवन गौरव केला जाणार आहे.

Comments are closed.

%d bloggers like this: