Take a fresh look at your lifestyle.

नेहा धुपियाचा नवरा अंगद बेदी याने आपल्या ५ गर्लफ्रेंडसह केले फोटो शेअर, म्हणाला,”तुम्हाला जे करायचे आहे ते करा…”

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया सध्या आपल्या वक्तव्याबद्दल बर्‍यापैकी ट्रोल होत आहे. अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून एमटीव्ही शो ‘रोडीज’ मध्ये गॅंग लीडर म्हणून जोडली गेलेली आहे. या वेळी देखील नेहा धुपिया ही गॅंग लीडर म्हणून ‘रोडीज रेव्होल्यूशन’ मध्ये सह्भागी आहे. पण अलीकडेच ‘रोडीज रेव्होल्यूशन’मध्ये केलेल्या विधानाबाबत अभिनेत्री बर्‍यापैकी ट्रोल होत आहे. आता नेहाच्या समर्थनार्थ तिचा नवरा आणि अभिनेता अंगद बेदी उतरला आहे. अलीकडेच अंगद बेदी याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही छायाचित्रे शेअर केली आहेत, जी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

 

फोटो शेअर करताना अंगद बेदी याने लिहिले आहे की, माझ्या पाच गर्लफ्रेंड्ससह हा माझा फोटो आहे.अंगद बेदीने नेहा धुपियाबरोबर ही सर्व छायाचित्रे शेअर केली आहेत. फोटो शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “ऐका, या आहेत माझ्या पाच गर्लफ्रेंड्स, करा तुम्हाला काय करायचे आहे ते.” लोक अंगद बेदी याच्या पोस्टवर बऱ्याच कमेंट करत आहेत आणि त्यांचा अभिप्राय देत आहेत.

सध्या ‘रोडीज रेव्होल्यूशन’ च्या ऑडिशन सुरू आहेत. यावेळी शोमध्ये आलेल्या एका स्पर्धकाने सांगितले की त्याने आपल्या कथित गर्लफ्रेंडला चापट मारली. ‘रोडीज’मध्ये, स्पर्धकाने सांगितले की तिने त्याच्या गर्लफ्रेंडला चापट मारली कारण तिचे अन्य ५ मुलांबरोबरही संबंध होते आणि त्याची फसवणूक केली जात होती. यावर नेहा धुपियाने स्पर्धकाला सुनावले, “तू जे असे म्हणत आहेस कीती पाच मुलांबरोबर गेली. ऐक, माझा निर्णय, हा तिचा निर्णय आहे, कदाचित तुमच्यात काहीतरी कमी आहे.पण तुला त्या मुलीला मारहाण करण्याचा अधिकार नाही “. तिच्या या वक्तव्याबद्दल नेहाला बरेच ट्रोल केले.

Comments are closed.