सलमान खानला व्हायचे आहे लग्नाआधीच बाप

Sharing is caring!

मुंबई सिने सृष्टीवर आपल्या अमिट अभिनायाची छाप आसलेला अभिनेता म्हणजे सलमान खान. त्याच्या तगड्या बॉडीच्या अनेक मुली आणि महिला दिवाण्या आहेत. तर त्याच्या अभिनयाचे लाखो करोडो चाहते आहेत. मात्र सलमान खानच्या आयुष्यात एका प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळाले नाही. तो प्रश्न म्हणजे सलमान खान लग्न कधी करणार?

सलमान लग्न कधी करणार या प्रश्नाचे उत्तर मिळत नसले तरी सलमान खानला लग्नाआधीच बाप व्हायचे आहे. लग्नाआधीच बाप होण्याची त्याची इच्छा तो सरोगसीद्वारे पूर्ण करणार आहे. अशा आशयाचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने छापले आहे. या आधी देखील बड्या हस्तींनी सरोगसीद्वारे आपले बाप होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. करण जोहर, तुषार कपूर, आमिर खान, शाहरुख खान आदी बॉलिवूड हस्तींनी बाप होण्याचे स्वप्न सरोगसीच्या माध्यमातून पूर्ण केले आहे.

सलमान खानला छोट्या मुलांची अत्यंत आवाड आहे. त्याच्या भाच्या सोबत आणि पुतण्या सोबत त्याला मस्ती करायला खूप आवडते. त्याने दिलेल्या एका मुलाखतीत आपण एक चांगला मुलगा आहोत आणि चांगला बाप होऊ शकतो मात्र चांगला पती होऊ शकत नाही असे विधान केले होते. त्याचे हे विधान त्यांच्या भविष्यकाळाचे भाकीत होते का असा प्रश्न त्याच्या सरोगसीच्या निर्णयावरून उपस्थित केला जातो आहे.

Leave a Reply