Take a fresh look at your lifestyle.

आता सारा अली खानच्या घरातही करोना; कारचालकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

मुंबई| सिनेसृष्टीत करोनाची दहशत वाढत चालली असून आता अभिनेत्री सारा अली खानच्या अवतीभवतीही करोना संकट घोंगावू लागलं आहे. साराच्या कारचालकाचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून याबाबत तिनेच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून माहिती दिली आहे

सारा अली खान हिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून याबाबत तपशील दिला आहे. आमच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत असलेल्या व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत मुंबई महापालिकेला तातडीने कळवण्यात आले. त्यानंतर पालिकेने संबधित ड्रायव्हरला विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. चालकासह मी, माझे कुटुंबीय आणि अन्य स्टाफ या सर्वांची करोना चाचणी करण्यात आली. त्यात आमचे सगळ्यांचे चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तरीही आम्ही आवश्यक सर्व काळजी घेत आहोत, असेही साराने आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये नमूद केले

View this post on Instagram

🙏🏻🙏🏻🙏🏻

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

साराने मुंबई पालिकेचेही आभार मानले आहेत. पालिकेने मला आणि माझ्या कुटुंबाला तत्परतेने साह्य केले. नियमावलीही समजावून सांगितली. त्यासाठी मी धन्यवाद व्यक्त कर असून सर्वांनीच आपली काळजी घ्यावी, अशी ही वेळ असल्याचेही साराने पुढे म्हटले आहे.