Take a fresh look at your lifestyle.

अँड ऑस्कर गोज टू…. ‘जोकर’ !

‘जॉकीन फिनिक्स’ने पटकावला जोकर साठी ऑस्कर; ब्रॅड पिटचा करियर मधला पहिला ऑस्कर !

ऑस्कर वारी । नुकत्याच आलेल्या अपडेटनुसार खूप उत्सुकता असलेल्या जोकर चित्रपटासाठी अभिनेता जॉकीन फिनिक्सला सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी २०२०चा ऑस्कर अवॉर्ड मिळाला आहे. हा २०२०मध्ये जोकेरला मिळालेला दुसरा ऑस्कर आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेता – जॉकीन फिनिक्सला (चित्रपट – जोकर)

यावर्षी ऑस्करमध्ये ‘जोकर’ या चित्रपटाने सर्वाधिक नामांकनं पटकावली आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अशा एकूण ११ विभागांमध्ये जोकरनं नामांकन मिळवली आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वाधिक पुरस्कार पटकावण्याची संधी याच चित्रपटातील कलाकारांकडे असल्याचे म्हटले जात आहे.

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – ब्रॅड पिट (वन्स अपॉन या टाइम इन हॉलीवूड)

दक्षिण कोरियातील ‘पॅरासाइट’ या चित्रपटाला सहा नामांकनं मिळाली आहेत. ‘पॅरासाइट’ हा चित्रपट यंदाचे खरे आकर्षण आहे. कारण इंग्रजी नसतानाही या चित्रपटाला ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादित नामांकन मिळालं आहे.

इंटरनॅशनल फिचर फिल्म – पॅरासाईट

‘पॅरासाईट’ या चित्रपटाने ‘इंटरनॅशनल फिचर फिल्म’ या विभागात ऑस्कर पटकावला आहे. ऑस्करसाठी नामांकन मिळवणारा हा पहिलाच कोरियन चित्रपट आहे. आणि पहिल्याच वर्षात त्यांनी ऑस्करवर आपले नाव कोरले.

बोंग जून हो यांनी ‘पॅरासाईट’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला. यंदाच्या ऑस्करमध्ये या चित्रपटाला मिळालेला सलग तीसरा पुरस्कार आहे.

 

Comments are closed.

%d bloggers like this: