Take a fresh look at your lifestyle.

दक्षिण कोरियाचा ‘पॅरासाईट’ ठरला सर्वोत्कृष्ठ चित्रपट ! ऑस्कर २०२०

ऑस्कर वारी । क्वेण्टिन टॅरॅण्टिनोचा ‘वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड’, मार्टिन स्कॉर्सेसीचा ‘द आयरिश मॅन’ आणि सॅम मेंडीसचा ‘१९१७’ या चित्रपटांना प्रत्येकी १० नामांकनं जाहीर झाली आहेत. तसेच दक्षिण कोरियातील ‘पॅरासाइट’ या चित्रपटाला सहा नामांकनं मिळाली आहेत. ‘पॅरासाइट’ हा चित्रपट यंदाचे खरे आकर्षण आहे. कारण इंग्रजी नसतानाही या चित्रपटाला ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादित नामांकन मिळालं होतं.
सर्वोत्कृष्ठ चित्रपट – ‘पॅरासाईट’ (दक्षिण कोरिया)

 

जाणून घ्या इतर विजेते

खूप उत्सुकता असलेल्या जोकर चित्रपटासाठी अभिनेता जॉकीन फिनिक्सला सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी २०२०चा ऑस्कर अवॉर्ड मिळाला आहे. हा २०२०मध्ये जोकेरला मिळालेला दुसरा ऑस्कर आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेता – जॉकीन फिनिक्सला (चित्रपट – जोकर)

सर्वोत्कृष्ट अभिनेती – रेनी झिल्वेगर (जुडी)


इंटरनॅशनल फिचर फिल्म – पॅरासाईट

पॅरासाईट या चित्रपटाने ‘इंटरनॅशनल फिचर फिल्म’ या विभागात ऑस्कर पटकावला आहे. ऑस्करसाठी नामांकन मिळवणारा हा पहिलाच कोरियन चित्रपट आहे. आणि पहिल्याच वर्षात त्यांनी ऑस्करवर आपले नाव कोरले.

 

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – ब्रॅड पिट (वन्स अपॉन या टाइम इन हॉलीवूड)