Take a fresh look at your lifestyle.

कबीर सिंगला केलं पोलिसांनी ट्रोल; लढवली ‘अशी’ भन्नाट शक्कल !

सोशल कट्टा । लोकांवर चित्रपट आणि त्यातल्या कलाकारांचा मोठा पगडा असतो. गुरुग्राम पोलिसांचं एक ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. पोलिसांनी ट्विटमधून अभिनेता शाहिद कपूरने अभिनय केलेल्या ‘कबीर सिंग’ चित्रपटातील एकाच दृश्याचा फोटो शेअर करत ट्रोल केलं आहे. या सीनमध्ये कबीर सिंग आपली प्रेयसी प्रितीला भेटण्यासाठी बुलेटवरुन जात असतो. चित्रपटातील हा सीन प्रेक्षकांना खूप आवडला होता. पण जेव्हा शाहीद कपूर बाइकवरुन जात असतो तेव्हा त्याने हेल्मेट घातलेलं नसतं.

   पोलिसांनी आपली क्रिएटिव्हीटी आणि ह्युमर दाखवत शाहिद कपूरला या सीनमध्ये हेल्मेट घातलेलं दाखवलं आहे. पोलिसांचं हे ट्विट नेटकऱ्यांना प्रचंड आवडलं असून त्याच्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

   एडिट केलेला हा फोटो ट्विट करताना गुरुग्राम पोलिसांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, तू वाचलास तरच प्रितीला वाचवू शकशील. यावेळी बाइक चालवताना नेहमी हेल्मेट घालावं असंही लिहिण्यात आलं आहे.