Take a fresh look at your lifestyle.

चाहत्यांना भाळला प्राजक्ता माळीचा कातिलाना अंदाज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील ओळखीचे आणि प्रसिद्ध नाव म्हणजे प्राजक्ता माळी. आपल्या अनोख्या अंदाजाने आणि घायाळ करणाऱ्या अदांनी तिने आपला वेगळा असा चाहता वर्ग तयार केला आहे. अगदी छोट्या पडद्यापासून रुपेरी पडद्यापर्यंत प्राजक्ताने आपल्या अभिनयाचा प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटविला आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती नेहमीच वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ आपल्या चाहत्यांसह शेअर करीत असते. नुकतेच तिने नवे फोटोशूट शेअर केले आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते अक्षरशः घायाळ झाले आहेत.

छोटया पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्‍ता माळीने आपल्या दमदार अभिनयाने कलाक्षेत्रातील चढाओढीच्या स्पर्धेत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे तिचे फॅन फॉलोईंग एकदम जबरदस्त आहे. तिने नुकतेच स्वतःचे काळ्या रंगाच्या साडीतले कातिलाना फोटो आपल्या चाहत्यांसह शेअर केले आहेत. हे फोटो पोस्ट केल्यावर अगदी काहीच क्षणात त्यावर चाहत्यांची मोठ्या संख्येने लाईक आणि कमेंट्स केले आहेत. चक्रिवादळ.. दुष्काळात तेरावा महिना.. गमतीचा भाग सोडा आणि स्वत:ची व कुटूंबाची जरा जास्त काळजी घ्या..’ असे कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.

प्राजक्ताने शेअर केलेल्या या फोटोंवर असंख्य चाहत्यांच्या कौतुक करणाऱ्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. तसेच लाइक्‍सचा तर पाऊस पडत आहे, असे म्हणायला काही हरकत नाही. अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झालेच तर अगदी ‘टॅलेंट हंट शो’मध्ये सहभागी होण्यापासून ते अगदी एखाद्या शोची हटके आणि जबरदस्त निवेदिका होईपर्यंत अभिनेत्री प्राजक्ता माळीने मेहनतीची पराकाष्टा केली आहे. केवळ टीव्ही मालिका किंवा शो नव्हे तर प्राजक्ताने आपल्या अभिनयाची छाप चित्रपटांमध्येही उत्तमरीत्या पाडली आहे.