Take a fresh look at your lifestyle.

मराठीमध्ये प्रवीण तरडे घेतात सर्वाधिक मानधन? पाहुयात ते काय म्हणतात..

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । ‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे हे सध्याच्या घडीला मराठीत सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार आहेत अशी माहिती समोर आली आहे. प्रवीण तरडे हे एका चित्रपटासाठी तब्बल ५० लाख रुपयांचं मानधन घेत असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती कितपत खरी आहे याबद्दलच स्पष्टीकरण खुद्द त्यांनीच दिलं आहे.

एका विशेष मुलाखतीत त्यांनी सांगितले कि, “मी एका सामान्य कुटुंबातून वर आलोय. दहा बाय दहाच्या खोलीत आम्ही राहायचो. हे खरं आहे कि मला यावर्षी सगळ्यात जास्त मानधन मिळालं.आहे, पण हे फक्त अभिनयासाठी नाही. त्यात कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन या सर्व बाबींचाही समावेश आहे. म्हणून माझं मानधन जास्त आहे. पण ते मी केलेल्या कष्टामुळेच मिळाले आहे. माझे सिनेमे चालतायत, म्हणूनच माझं मानधन वाढतंय.”

लेखक म्हणून चांगलं मानधन मिळाल्याचं जास्त समाधान असल्याचं ते म्हणतात.त्यांनी , ‘पिंजरा’, ‘कन्यादान’ ‘तुझं माझं जमेना’, ‘कुंकू’ या मालिकांसाठी लेखन केलं आहे. ‘मुळशी पॅटर्न’ या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद हे लिहिले आहे. या सिनेमातील त्यांनी साकारलेलं नन्याभाई हे पात्रही लोकप्रिय झालं. ‘देऊळ बंद’ आणि ‘मुळशी पॅटर्न’ या दोनहि सिनेमांचं दिग्दर्शनही प्रवीण तरडे यांनी केलेल आहे.

Comments are closed.

%d bloggers like this: