Take a fresh look at your lifestyle.

Priyanka Chopra Bday | जाणुन घ्या तुम्हाला माहित नसलेल्या देसी गर्ल बद्दलच्या काही खास गोष्टी

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवुड ची देसी गर्ल अर्थातच अभिनेत्री प्रियांका चोप्रा आज तिचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे.अगदी कमी कालावधीतच बॉलीवूड आणि हॉलीवूड मध्ये आपलं नाव कमवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांकाचे नाव घेतलं जातं.आज आपण जाणून घेऊया प्रियांका बद्दलच्या काही गोष्टी.

1)प्रियांका मुंबईमध्ये जोपर्यंत होती तोपर्यंत आपला प्रत्येक वाढदिवस तिने अनाथ मुलं आणि कर्करोगग्रस्त मुलांसोबत साजरा केला. ही तिची सर्वात आवडती गोष्ट होती.

2) करिअरमध्ये नेहमीच नाविण्याच्या शोधात राहिली. ‘ऐतराज’ सिनेमात नकारात्मक भूमिका करायला अनेकांनी नकार दिला होता. मात्र तिने ही भूमिका स्वीकारली. पण असं असलं तरी नकारात्मक भूमिका फक्त हीच तिची ओळख राहिली नाही.

3) दोनदा जगातील सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीत प्रियांकाचं नाव आलं आहे. ‘गॉड तुसी ग्रेट हो’ सिनेमाच्या चित्रीकरणा दरम्यान तिच्या वडिलांची तब्येत बिघडली होती. मात्र तरीही सिनेमाचं शूटिंग तिने न थांबता अधिक वेळ देऊन पूर्ण केलं होतं.

4)प्रियांकाचं अमेरिकेला जाण्यामागचं एक कारण तिचे ब्रेकअप असल्याचंही म्हटलं जातं. अनेक ब्रेकअपनंतर ती मनातून तुटली होती. ती मनाने फार हळवी आहे. ‘गंगाजल’ सिनेमाच्या चित्रीकरणातील एका फाइट सीनमध्ये चुकून तिचा पाय सहकलाकार मानव कौलच्या गळ्यावर लागला होता. या घटनेनंतर ती ढसाढसा रडली होती.

Comments are closed.