Take a fresh look at your lifestyle.

‘या’ ब्लॉकबस्टर हॉलीवूड फ्रँचाइझीमध्ये दिसणार प्रियांका चोप्रा !

तिकीट टू हॉलीवूड । आपली प्रियांका चोप्रा आता हळू हळू हॉलीवूड मध्ये आपले पाय पसरताना दिसत आहे. अनेक इंटरनॅशनल इव्हेंट्स ला तिची असणारी उपस्थिती कायमच चर्चेचा विषय असताना एक नवीन आणि मोठी बातमी आहे. ‘द मॅट्रिक्स’ या हॉलीवूड फ्रँचायझीमध्ये सामील होण्यासाठी प्रियांका चोप्रा चर्चेत असल्याचे समोर आले आहे. प्रोजेक्टच्या जवळच्या सूत्रांनी हे स्पष्ट केले की, प्रियंकाने हॉलिवूडमधल्या या ब्लॉकबस्टर अ‍ॅक्शन आणि साय-फाय फिल्म फ्रँचायझीचा अधिकृतपणे भाग होण्यासाठी अंतिम चर्चेला तयार झालीय. जरी तिची भूमिका अज्ञात असली तरी हे नक्कीच हॉलिवूडमधील प्रियंकासाठी एक रोमांचक आणि मोठे पाऊल आहे.

अजून नाव नसलेल्या चौथ्या मॅट्रिक्स चित्रपटाचे दिग्दर्शन लाना वाचोस्की करणार आहेत, ज्यांनी मूळतः पहिल्या तीन मॅट्रिक्स चित्रपटासाठी दिग्दर्शक म्हणूनहि त्यांनीच काम केले होते. या चित्रपटाच्या नव्या कास्टमध्ये ‘द मॅट्रिक्स’ स्टार कीनू रीव्ह्ज आणि कॅरीएनी मॉस यांचा समावेश आहे, जे आधीच्याच त्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. पिन्केट स्मिथ देखील नवीन मॅट्रिक्स चित्रपटात काम करण्यासाठी चर्चेत आहे.

आधीच्या चित्रपटांमध्ये व्हिलन म्हणून काम करणाऱ्या ह्युगो वीव्हिंगलाही त्यांच्या भूमिकेबद्दल पुन्हा बोलण्यासाठी संपर्क केला होता. पण त्यांचं डेट्स अड्जस्ट ना झाल्यामुळे ते पात्रच चित्रपटातून हटवण्यात आले आहे.

मॅट्रिक्स फ्रँचायझीमध्ये काही नवोदित कलाकारांचीहि घोषणा केली गेली आहे. आतापर्यंतच्या यादीमध्ये याह्या अब्दुल मतेन, जेसिका हेनविक आणि नील पॅट्रिक हॅरिस यांची नावे आहेत. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच उत्तर कॅलिफोर्नियामध्ये सुरू होईल.