Take a fresh look at your lifestyle.

कोरोनामुळे प्रियांका निकसह सेल्फ आयसोलेशनमध्ये म्हणाली कि, आयुष्यात… पहा व्हिडिओ

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । प्रियांका चोप्रा आणि तिचा पॉप स्टार नवरा निक जोनास यांनी आत्मविश्वासात आठ दिवस आयसोलेशन पूर्ण केले आहेत. अशा परिस्थितीत अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने या परिस्थितीचे त्रासदायक म्हणून वर्णन केले आहे. व्हिडिओमध्ये प्रियांका म्हणत आहे, “मला आशा आहे की तुम्ही सर्व तिथे सुरक्षित असाल. मला तिथे येऊन तुमच्या सर्वांना हॅलो म्हणायचे आहे. खरोखरच त्रासदायक वेळ आहे आणि आपल्या सर्वांचे जीवन उलटेपालटे झाले आहे. से वाटत आहे कि एखाद्या चित्रपटाचा भाग असल्यासारखे दिसत आहे, परंतु तसे नाही आहे. निक आणि मी गेल्या आठवड्यापासून घरी आहोत आणि आज आमचा सेल्फ आयसोलेशनचा आठवा दिवस आहे .आमचे शेड्यूल खूप बिझी होते आणि आम्ही आमच्या अवती भोवती लोक होते आणि अचानक बदललेल्या परिस्थितीने आम्हांला हैराण केले. तुम्हा सर्वानाहि तसंच वाटत असेल याची खात्री आहे. “

 

याशिवाय प्रियांका चोप्रा म्हणाली, “आम्ही सर्व आवश्यक ती खबरदारी घेत आहोत, आम्ही सुरक्षित आहोत, आम्ही स्वस्थ आहोत आणि आम्ही फक्त सामाजिक अंतर राखत आहोत.”

 

 

प्रियांका ‘द स्काई इज पिंक’ मध्ये दिसली होती. या चित्रपटात अभिनेता फरहान अख्तर, अभिनेत्री जायरा वसीम आणि अभिनेता रोहित शराफ त्यांच्यासोबत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले. या चित्रपटाद्वारे अभिनेत्रीने सुमारे ३ वर्षानंतर बॉलिवूडमध्ये पुरागमन केले. प्रियांका चोप्रा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेती आहे तसेच तिने ५५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रियांका चोप्राने एबीसीवर तीन हंगामांसाठी प्रसारित होणारी ‘क्वांटिको’ हिट मालिकाद्वारे यू.एस.च्या टीव्ही अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

 

Comments are closed.