Take a fresh look at your lifestyle.

मॅन व्हर्सेस वाईल्डमध्ये सुपरस्टार रजनीकांत !

टीम, हॅलो बॉलीवूड । सुप्रसिद्ध मॅन वर्सेस वाईल्ड या कार्यक्रमामध्ये आजपर्यंत अनेक सेलेब्रिटी येऊन गेले. मागच्या वर्षी आपले पंतप्रधान मोदीही यात झळकले होते. आता खुद्द सुपरस्टार रजनीकांत लवकरच बियर ग्रिल्सच्या मॅन vs वाइल्ड शोमध्ये दिसणार आहेत. मागच्या वर्षी बियर ग्रिल्सने पंत्रधान मोदी यांच्यासोबत उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट पार्क येथे चित्रीकरण केलेल्या भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. यावेळी रजनीकांतबरोबर शो करताना बियर ग्रिल्सने कर्नाटकातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाची निवड केली आहे.

    सुपरस्टार रजनीकांत, बियर ग्रिल्स आणि मॅन vs वाइल्ड माहितीपट निर्मात्यांची टीम सोमवारी संध्याकाळपासून या माहितीपटाच्या चित्रीकरणासाठी व्याघ्र प्रकल्पात दाखल झाली आहे. मंगळवारी ६ तास आणि गुरुवारी ६ तास अशा दोन टप्प्यात शोचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.

‘द न्यू इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राशी बोलताना वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,’ २८ आणि ३० जानेवारीला दिवसाच्या वेळी केवळ सहा तास चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली आहे.’ मंगळवारी होणाऱ्या चित्रीकरणात रजनीकांत सहभाग घेतील तर असून ३० तारखेला बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार देखील या शोच्या चित्रीकरणात सामील होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Comments are closed.