Take a fresh look at your lifestyle.

राजकुमार हिराणी बनवणार क्रिकेटवर आधारित सिनेमा ?

0

चंदेरीदुनिया । बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माते राजकुमार हिराणी आता क्रिकेटवर आधारीत सिनेमा बनवणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राजकुमार हिराणी यांनी दोन क्रिकेटरसोबत सिनेमासाठी संपर्क साधला आहे असेही समजत आहे.
राजकुमार हिराणी यांच्याकडे खेळावर आधारीत 2 स्क्रिप्ट आहेत. यासाठी त्यांनी निर्मात्यांशीही संपर्क साधला आहे अशी माहिती समजत आहे.

हिराणींच्या आगामी सिनेमाला घेऊन अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच सूत्रांनी माहिती दिली आहे की, त्यांचा सिनेमा खेळावर आधारीत असणार आहे.राजकुमार हिराणी यांच्या जवळच्या आणि विश्वासू सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार हिराणी यांना क्रिकेटवर आधारीत 2 सिनेमांसाठी संपर्क करण्यात आला आहे. यातील एक स्क्रिप्ट फॉक्स स्टारची आहे. पियुष गुप्ता आणि नीरज सिंग यांनी लिहिलेला आणि लाला अमरनाथ यांचा बायोपिक आहे. याशिवाय क्रिकेटवर आधारीत आणखी एक दुसरी कथा आहे.

अभिजीत जोशींनी ही कथा लिहिली आहे.अशीही माहिती समोर आली आहे की, राजकुमार हिराणी वेब सीरीज बनवणार आहेत. यासाठी ते इतर काही स्क्रिप्टवर काम करत आहेत. दरम्यान ते नेमक्या कोणत्या स्क्रिप्टवर काम करत आहेत याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. असे असले तरी ते कोणत्या प्रोजेक्टवर काम करत आहेत हे आगामी काळात सर्वांसमोर येईलच.

Leave a Reply

%d bloggers like this: