Take a fresh look at your lifestyle.

‘तुर्रम खान’वरून थेट ‘छलांग’!

0

चंदेरी दुनिया । अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री नुसरत भरूच यांच्या ३१ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार्‍या चित्रपट ‘तुर्रम खान’ चे शीर्षक बदलले गेले आहे. चित्रपटाचे नाव बदलून ‘छलांग’ हे नवीन नाव देण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार्‍या नुसरतने आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली.

या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण यांनी केली आहे , तर त्याचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले आहे. चित्रपटातील दोन्ही मुख्य कलाकारांव्यतिरिक्त मोहम्मद झीशान अयूब देखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

चित्रपटाची कथा अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. मात्र ही कथा उत्तर प्रदेशच्या एका छोट्या शहरातील असून तेथील सामाजिक मुद्द्यांवर बेतली आहे असे सांगितले जाते.

Leave a Reply

%d bloggers like this: