Take a fresh look at your lifestyle.

राजश्रीने केले पुन्हा’दीदी तेरा देवर दिवाना’शूट,हे कलाकार असतील सलमान आणि माधुरीच्या भूमिकेत

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । राजश्री प्रॉडक्शन्स संस्कारी चित्रपट आणि मालिकांसाठी प्रसिध्द आहेत. या प्रॉडक्शन्स ची एक मालिका ‘दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ’ सध्या टीव्हीवर बरीच प्रसिद्धी मिळवित आहे.या शोची टीआरपी वाढवण्यासाठी राजश्री प्रॉडक्शन्स या शोमध्ये एक गाणे सादर करण्याची जोरदार तयारी करत आहे. यावेळी ‘दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ’ या मालिकेच्या सेटवर एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. मालिकेतील सेटवर हे दोन कलाकार सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्या सुपरहिट गाणे दीदी तेरा दीवाना दिवानाच्या गेटअपमध्ये दिसले.या मालिकेच्या मुख्य कलाकारांमध्ये अनघा भोंसले हि माधुरी दीक्षित आणि अंकित रायजादा हा सलमान खान बनले.तीच चमकणारी साडी,तीच बेल्ट पॅन्ट आणि हेडबँड.अनघा आणि अंकितने, सलमान आणि माधुरीच्या या गाण्याची उभेउभ नक्कल करण्याचा उत्तम प्रयत्न केला, ज्यामध्ये ते मोठ्या प्रमाणात यशस्वीही झालेत.

सलमान-माधुरीच्या या सुपरहिट गाण्यावर नृत्य करण्याचा आपला अनुभव सांगत अनघा म्हणते, ‘माझ्यासाठी हे एक स्वप्न साकार झाल्यासारखेच आहे. माधुरी दीक्षित ही माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे. मी तिच्या गाण्यांवर नाच केल्यापासून आणि तिच्यासारख्या पोशाख केल्यापासून मला मी हवेत उडत असल्याचा भास होत आहे असे वाटले. मला ३० मिनिटांत या गाण्यासाठी स्वत:ला तयार करावे लागले आणि ते माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते. माधुरी जींचे भाव समजून घेण्यासाठी मी या गाण्याचा व्हिडिओ बर्‍याच वेळा पाहिला आणि खात्री केली की जेव्हा मी गाणे चित्रित करेल तेव्हा असेच भाव माझ्या चेहऱ्यावरही यायला हवेत.

या गाण्यात अंकित रायजादा सलमानच्या भूमिकेत दिसणार आहे. तो म्हणतो, ‘माझ्यासाठी ही खरोखरच वेगळी भावना आहे कारण ‘हम आपके हैं कौन’हा माझा आवडता चित्रपट आहे.शिवाय त्याच प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करणे, तेच कपडे घालणे आणि सलमान खानच्या ‘दीदी तेरा देवर’ गाण्यावर नृत्य करणे माझ्यासाठी अविश्वसनीय होते. जरी मला माहित आहे की मी त्याच्यासारखे नक्कीच करू शकत नाही,तरीही माझ्या बाजूने ही त्याच्यासाठी एक छोटीशी भेट आहे.

Comments are closed.

%d bloggers like this: