Take a fresh look at your lifestyle.

विनामास्क चाहत्याला राखीने सुनावले खडेबोल, पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अश्यावेळी शासनाने काही नियमावली आखून दिली आहे. या नियमांचे पालन न केल्यास संसर्ग थांबविणे आणखी कठीण होणार, हे नक्की. मात्र तरीही लोकांमधील बेफिकीरी दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन करण्याची पाळी आली आहे. दरम्यान राखी सावंतने सेल्फी काढण्यासाठी समोर आलेल्या चाहत्याला विनामास्क पाहून चांगलेच खडसावले.

नुकतेच वर्कआऊट करून बाहेर पडलेल्या राखीला एका चाहत्याने सेल्फी काढण्यासाठी विचारले. त्या चाहत्याला विनामास्क पाहून राखी चांगलीच संतापली आणि चाहत्याला आधी मास्क लावण्याचे सांगितले. कोरोनाचे नियम पाळत नाहीत. मास्क, भाईसाहाब पेहले मास्क लगाव , मास्क नही लगाते, तुम जैसे लोगोके कारण मुंबई बंद हो गया है, गलत बात है, असं ती या व्हिडीओमध्ये बोलताना दिसतेय.

नुकतेच कॅटरिना कैफ आणि अक्षय कुमारचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर अभिनेता गोविंदालासुद्धा कोरोनाची हलकी लक्षणे आहेत. सोमवारी अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि विकी कौशल यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समजले आहे. तर रणबीर कपूर, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट, आमिर खान, आर माधवन, परेश रावल, मिलिंद सोमण, रोहित सराफ, सिद्धांत चतुर्वेदी, मनोज बाजपेयी, कार्तिक आर्यन आणि सतीश कौशिक, फातिमा सना शेख, आदित्य नारायण आणि त्याची पत्नी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यातील रणबीर कपूर, कार्तिक आर्यन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी कोरोनावर यशस्वी मात देखील केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.