Take a fresh look at your lifestyle.

‘या’ ठिकाणी होणार रणबीर-आलियाचा शाही विवाह सोहळा!

0

चंदेरी दुनिया । आलिया भट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची सध्या बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी दोघांच्या लग्नाची खोटी पत्रिकादेखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता पुन्हा एकदा या लव्हबर्ड्सच्या लग्नाची चर्चा सुरु झालीय. होय, मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, नव्या वर्षांत म्हणजे 2020 मध्ये आलिया व रणबीर लग्न करणार आहेत. विशेष म्हणजे, या लग्नाचे स्थळही ठरलेय.

आलिया व रणबीर डेस्टिनेशन वेडिंग प्लान करत आहेत आणि यासाठी त्यांनी विदेशाची नव्हे तर भारताचे नंदनवन अर्थात काश्मीरची निवड केली आहे. दोघेही कामातून महिनाभराची सुट्टी घेऊन लग्न करणार असून या लग्नाची तयारी सुरु झाली आहे.

सध्या आलिया-रणबीर ‘ब्रह्मास्त्र’च्या शूटींगमध्ये बिझी आहेत. काही तांत्रिक कारणाने या चित्रपटाची रिलीज डेट लांबणीवर पडतेय. आधी 2020 च्या उन्हाळ्यात हा सिनेमा रिलीज होणार होता. पण आता तो हिवाळ्यात रिलीज होणार असल्याचे कळतेय. याचदरम्यान आलिया-रणबीर लग्नाचे प्लॅनिंग करत आहेत.

‘ब्रह्मास्त्र’ याच चित्रपटाच्या सेटवर आलिया व रणबीर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन, नागार्जुन, डिंपल कपाडिया, मौनी राय महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: